मी विकास नागोसे (सहा. शिक्षक) MY SCHOOL ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत करतो, 7385 124360

जि. प. प्राथ. शाळा, खनोरा जि. प. प्राथ. शाळा, खनोरा जि. प. प्राथ. शाळा, खनोरा

ज्ञानरचनावाद म्हणजे काय ?

ज्ञानरचनावाद म्हणजे काय ?



१)भराडेमॅडम :- यांनी pptच्या सहाय्याने मेंदु शिकण्याचा अवयव आहे.शरीराच्या २% वजन असणार्‍या मेंदुस २०% प्राणवायु लागतो.मेंदु वाढ गर्भात ७०%,पहिल्या वर्षी १५%,तीन वर्षात १०%,बारा वर्षात ५%होते.जन्मतः१००अब्ज मज्जापेशी मेंदुत असतात.शिकणे नैसर्गिक आहे.सुखद अनुभवांनी मज्जापेशींना फुटवे फुटतात तर दुःखद अनुभवांनी मज्जापेशी नष्ट होतात.मुलास तु चांगला आहेस गोड आहेस असे प्रबलन देत रहाणे मेंदुविकासास महत्वाचे आहे.आपण वर्तनवादी पध्दतीचे गुलाम आहोत.गणित सोडवण्याच्या पध्दती सांगु नये मुलांनी शोधायला हवे.मुलांस भीती वाटते तेव्हा न्युरोकार्टिक्सकडुन भावनिककडे प्राणवायु पुरवठा होतो खंडित पुरवठा सतत होणारी मुले उपद्रवी बनतात.मुलांस आनंददायी वातावरणात शिक्षण चांगले होते.

इंग्रजी भाषा instruction 400अर्थासह संग्रहित केल्या.रोज १०सुचना देणे.Genral question 150 संकलित केले परिपाठावेळी 5प्रश्न विचारणे.तसेच Myselfप्रमाणेMy friend My School  My Teacher घेणे.स्वयंअध्ययनकार्ड flashcard रोज 5 घेणे.dictionary मधुन शब्द शोधण्याचा खेळ घेणे.नेटवरुन भरपुर rhymes घेणे.word puzzelsone word     one sentence   one question  असा शब्दावरुन वाक्य सांगणे प्रश्न तयार करणे.अशा गोष्टी सातत्याने घेणे.

वर्गतयारी  मार्चपासुन पहिली वर्ग सुरु मुले खेळण्यात रमतात. सोपी बडबडगीते घेतो.


उपक्रम

१)मोठ्या चित्रांची पुस्तके पहाणे चित्रवर्णन करणे.

२)चित्रगप्पा मारणे.

३)आठवड्यातुन एकदा ठरवुन गप्पा मारणे.

४)नठरवता गप्पा मारणे.

५)वाचनासाठी चित्रशब्दवाचनएकत्र नंतर फक्त चित्रवाचन व नंतर फक्त शब्दवाचन = पाचचित्रकार्डसंच लागोपाठ दोन दिवस द्यावेत.संयम ठेवावा.

६)चित्राशी शब्द जोड्या लावणे खेळ घेणे.प्रत्येक विद्यार्थ्यास स्वतंत्र संच हवा.हिमोग्लोबीन कमतरतेचा मेंदुवर बौध्दीक क्षमतेवर परिणाम होतो.यासाठी कुमठे बीटात सर्व शाळांत सेंद्रियशेती केली जाते कसदार माती बनवली जाते त्यातील भाज्या शालेय पोषण आहार टाकल्या जातात.
मराठी विषय. शाळा मुलांसाठी आहेत अधिकारी आलेतरी मुले कामांत मग्न असतात.सप्टेंबरपर्यंत मुले वाचु लागतात.
उपक्रम

१)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्रवाचन घेणे.त्यातील आवडीचा शब्दघेवुन शब्दावरुन वाक्ये बनविणे.

२)शब्दभेंड्या खेळ घेणे.

३)वाचनपट(शब्दडोंगर)बनवणे.
लेखनाचे उपक्रम

१)धुळपाटीवर लेखन.

२)हवेत अक्षर गिरविणे.

३)समान अक्षर जोड्या लावणे.

४)अक्षरआगगाडीबनवणे.

५)पाहुणाअक्षरखळणे.

६)चित्रशब्द वाक्यवाचन करणे.

७)बाराखडीवाचन करणे.

८)बाराखडीतक्तेवाचन करणे.

९)स्वरचिन्हयुक्त शब्दांचे बाक्समधील ५०० शब्द वाचणे.

१०)थिमनुसार शब्दचक्र बनवणे.

११)कथालेखनकरणे. १२)कविता लेखन करणे.

१३)चिठठीलेखनकरणे.१४)संवादलेखनकरणे.१५)मराठी शब्द कोशात शब्द शोधणे.

गणित उपक्रम

१)खडेमोजुनघेणे,एकमेकांचे मोजणे२)वर्गातील वस्तु मोजणे३)अवयव मोजणे४)कार्डसंख्या पाहुन वस्तु मांडणे५)कार्ड घेवुन गोलात फिरणे नाव घेणाराने आत जाणे.६)आगगाडी तयार करणे७)दोघींनी मिळुन संख्या बोटावर दाखवणे.८)माळेवर मणी मोजुन संख्या दाखवणे.९)अंकाची गोष्ट सांगणे.१०)बेरीज व्यवहार मांडणी शाब्दीक व अंकी करणे.११)बेरीज उभी आडवी मांडणी करणे १२)चौकटीची जागा बदलुन उदाहरण सोडवणे.१३)बेरीजगाडी तयार करणे.१४)अंकांपुढे वस्तु मांडणे १५)गठ्ठे सुट्टे सांगणे१६)मणीमाळेवर १ ते १०० संख्यावाचन रोज ४ वेळा घेणे.


No comments:

Post a Comment